जिल्हा

साई जलाराम प्रतिष्ठानच्या दहीहंडीत २१ लाखांची बक्षिसे

साई जलाराम प्रतिष्ठानच्या दहीहंडीत २१ लाखांची बक्षिसे
साई जलाराम प्रतिष्ठानच्या दहीहंडीत २१ लाखांची बक्षिसे फोटो: ठाणे वैभव

ठाणे : गेल्या २६ वर्षांपासून दहीहंडी उत्सवाची परंपरा जपणाऱ्या साई जलाराम प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा दहीकाला उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी तब्बल २१ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली असून बाळकुम परिसरासाठी खास मानाच्या हंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या दहीहंडी उत्सवात प्रो गोविंदाचा थरार देखील ठाणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला सहा लाखांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह मिळणार आहे. त्यामुळे साई जलाराम प्रतिष्ठानच्या  यावर्षीच्या दहीहंडी उत्सवाकडे गोविंदा पथकांसह ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

साई जलाराम प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या २६ वर्षांपासून बाळकुम परिसरात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा उत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक करण्यात आले आहे. दहीहंडीच्या निमित्ताने गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तब्बल २१ लाख रुपयांच्या बक्षिसांमुळे विविध गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दहीहंडी उत्सवाला राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह सिनेकलाकारही उत्सवाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक तथा नगरसेवक संजय भोईर यांनी दिली. 

या उत्सवात १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला सहा लाखांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह मिळणार आहे. तर नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पाच लाखांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह मिळणार आहे. आठ थर लावणाऱ्यांना २५ हजार, सात थर लावणाऱ्यांना १० हजार, महिला गोविंदा पथकाला २५ हजार आणि बाळकूमची मानाची हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला ३० हजार रोख आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे, अशी माहिती विकेश भोईर यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475